सर्वात मोठी बातमी : ठाकरे सरकार करणार 1 लाख पदांची मेगाभरती

Foto
मुंबई :-  भाजप सरकारने राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली होती. त्यानंतर महाविकासआघाडी  सरकारने या जागा भरणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच यात आणखी 29 हजार पदांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पदांची संख्या 1 लाख 1 हजार इतकी झाली आहे. दोन लाख खाली असलेल्या पदांपैकी 50 टक्के जागा भरण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. त्यानुसार शासकीय विभागातील रिक्त पदांची माहिती संकलित करण्याते काम सामान्य प्रशासन विभागातर्फे सुरु करण्यात आले आहे.

महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आल्यानंतर महाआयटीच्या नियंत्रणात खासजी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अडीच महिन्यात मेगाभरतीला सुरुवात होणार असून दिवाळीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

ठाकरे सरकारच्या मेगाभरतीत आरोग्य, शिक्षण, गृह, महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील जागा भरण्यात येणार आहेत. वर्ग- एक आणि वर्ग- दोन अधिकाऱ्यांची भरती एमपीएससी मार्फत केली जाणार आहे, तर वर्ग-तीन आणि वर्ग-चारची भरती खासगी एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker